Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांचा कार्यालय प्रवेश३७२ क्रीडापटूंचे सरकारी सेवेत थेट समावेशन, क्रीडापटूंना आर्थिक बळ देण्यासाठी रोख पारितोषिकेबांधकाम समिती सभापती सारिका नांंदेकर यांचा कार्यालय प्रवेशभुदरगड- चंदगड तालुक्यांपुढे स्वित्झर्लंड देशही फिका, पर्यटनस्थळे विकसित करण्याची गरजउदय सामंत म्हणाले, २०२९ मधील निवडणुकीत संजय मंडलिक हे लोकसभेचे उमेदवारवडगाव येथील मच्छीमार ठेकेदाराचा आत्मदहनाचा इशारासतेज चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ ! प्रॅक्टिस क्लब, वेताळमाळ तालीम विजयी !!छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारी

जाहिरात

 

शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांचा कार्यालय प्रवेश

schedule05 Apr 26 person by visibility 26 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समिती सभापती शितल प्रवीण यादव यांचा कार्यालयीन प्रवेश नुकताच झाला. आमदार अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, उपाध्क्ष तानाजी पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील ,बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिह माने, उपमहापौर अक्षय जरग, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सभापती यादव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे  मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes