श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर रॅपसाँग, २४ मे रोजी कोल्हापुरात लॉन्चिंग !
schedule25 Apr 26 person by visibility 16 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ यांच्या स्वामीलिला अनुभूतीवर प्रथमच रॅपसाँग येत आहे. अक्कलकोट, सांगोला, कोल्हापूर आदी ठिकाणी या रॅपसाँगचे शूटींग झाले आहे. हे रॅपसाँग नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास कलाकारांनी दिली.या रॅपसाँगमध्ये प्रमुख कलाकार म्हणून तेजश्री मोरे, सोनम धनुकटे, नंदकुमार निळकंट, विशाल खांडेकर, स्वामींच्या भूमिकेतील आनंदराव गायकवाड, बाल कलाकार वेदांत खांडेकर आदींनी काम केले आहे.२४ मे २०२६ रोजी या रॅपसाँगचे कोल्हापूरात मोठ्या दिमाखदार सोहळ्यात लॉन्चिंग करणार आहोत. श्री स्वामी समर्थ रॅपसाँगसाठी स्वामी भक्त अमोल कोरे, अमोल बिडकर, सुहास पाटील यांच्यासस अनेकांनी सहकार्य केले आहे. पत्रकार परिषदेला अमोल कोरे, अमोल बिडकर, सुहास पाटील, प्रतिक्षा पाटील उपस्थित होते.