Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
न्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडशिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या, पदांच्या माध्यमातून न्याय द्यावाश्री स्वामी समर्थांच्या जीवनावर रॅपसाँग, २४ मे रोजी कोल्हापुरात लॉन्चिंग !आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतारनगरीप्रस्तावित आयटी पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नाव द्या, आमदार क्षीरसागरांची उद्योगमंत्र्यांच्याकडे मागणीप्रशासनाकडून तारीख पे तारीख ! संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम कासवगतीने !! अद्ययावत आयटी पार्कचा कालबद्ध रोडमॅप करा, सरकारकडून जे जे होईल ते सहकार्य करू -पालकमंत्री प्रकाश आबिटकरआयटी असोसिएशनचा अनोखा संकल्प ! तोपर्यंत नो फेटा…नो सत्कार ! !सुनावणीस विलंब, प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक ! सहायक निबंधक कार्यालयावर धडक !!कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर

जाहिरात

 

आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतारनगरी

schedule25 Apr 26 person by visibility 18 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये प्रथमच ड्रीम वर्क फन फेअर सादर करत आहे अवतार नगरी.दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या ड्रीम वर्क फन फेअरमध्ये मनोरंजनासह खेळायला मिळणार आहे.अवतार चित्रपटात साकारण्यात आलेल्या सर्व बाबी उभ्या करण्यात आल्या आहेत.याचबरोबर कृत्रिम धबधबा, ७० हजार विद्युतदिव्यांचा झगमगाट, ६० बाय १८० फूट मध्ये ही नगरी वसविण्यात आली आहे. अशी माहिती निजामुद्दीन आणि पवनकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अवतार शो,दुबई वॉटरफॉल,शॉपिंग स्ट्रीट,चाट भंडार,फूड फेस्ट,मजेदार गेम्स आणि १० पेक्षा जास्त भव्य राईड्स यात जायंट व्हील,ब्रेक डान्स,कोलंबस,सोलोम्बो,ड्रॅगन राईड,किड्स राईड्स,मोठा पाळणा इत्यादींमध्ये आनंदाने राइड करू शकणार आहेत. मुलांसाठी जंपिंग, मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राइड्स आहेत. घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे,मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे. याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स, पॉप-कॉर्न, कॉटन कँडी, पाणीपुरी, चाट आदी खाण्यास मिळणार आहे.शिवाय सेल्फीही काढता येणार आहे.सायंकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.तरी कोल्हापूर मध्ये प्रथमच आलेल्या या नगरीस कोल्हापूरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes