+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Mar 23 person by visibility 442 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात काँग्रेसतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हे देशात हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे असा आरोप करत भाजपच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई करण्याचा निर्धार यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केला.  "राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा व्यक्त केला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आंदोलनाचे नियोजन केले होते. आंदोलनात आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पापाची तिकीट येथे आंदोलन झाले. महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरात झालेल्या सत्याग्रह आंदोलनमध्ये काँग्रेसच्या नेते मंडळींनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे सरकार उलथवून टाकण्यासाठी सर्वांनी तयार राहावे असे आवाहन यावेळी नेते मंडळीनी केले.
 "राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है, लढेंगे जितेंगे, इन्कलाब जिंदाबाद, आवाज दो हम एक है, संविधान बचाव देश बचाओ, भाजप हटाव देश बचाओ, भाजप सरकार मुर्दाबाद-मोदी सरकार मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, चले जाओ चले जाओ -मोदी सरकार चले जाओ, गांधी लढे ते गोरोंसे -हम लडेंगे चोरोंसे, "अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळ दणाणून सोडला.
आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी बाजीराव खाडे, गुलाबराव घोरपडे, सरला पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, शशांक बावचकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राधानगरी तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगुले करवीर तालुका अध्यक्ष शंकरराव पाटील, कागलचे शिवाजी कांबळे, शिरोळचे सर्जेराव शिंदे, हातकणंगलेचे भगवान जाधव, भुदरगडचे शामराव देसाई, गगनबावडाचे बजरंग पाटील, गडहिंग्लजचे प्रशांत देसाई, भोगावती कारखान्याचे उदयसिंह पाटील कौलवकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सत्यजित जाधव, पांडुरंग भांदिगरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रिया साळोखे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेविका भारती पोवार,  माजी उपमहापौर संजय मोहिते, भूपाल शेटे, शारंगधर देशमुख, मधुकर रामाने, सुरेश ढोणुक्षे, प्रतापसिंह जाधव,  प्रकाश नाईकनवरे, ईश्वर परमार, राजाराम गायकवाड, राजूू साबळे, शिक्षक नेेते भरत रसाळे, गोकुळचे संचालक बााळासाहेब  खाडे, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले , काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष रंगराव देवणे, दिनकर हराळे,  सदाशिव चरापले, विद्याधर गुरुंबे, शाहू काटकर, शिवाजी कारंडे, संदीप पाटील, महमंदशरीफ शेख, किशोर खानविलकर, संजय पवार वाईकर, जगमोहन भुरके, संपतराव चव्हाण पाटील, ओबीसी सेलचे बाळासाहेब गुरव , आकाश शेलार, उमेश पोरलेकर, युवा काँग्रेसचे वैभव तहसीलदार, उदय पवार,  शिवानंद बनसोडेे, रियाज सुभेदार, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम, महिला आघाडीच्या चंदा बेलेकर, लीला धुमाळ, वैशाली महाडिक, हेमलता माने, शुभांगी साखरे आदींचा सहभाग होता.