Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय -खासदार धनंजय महाडिकटेक्नोलॉजिया स्पर्धेत डीवाय पाटील इंजिनीअरिंग कॉलेज अव्वल ! न्यू कॉलेजला उपविजेतेपद !!महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष ग्रंथाचे रविवारी प्रकाशनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारघाटगे ग्रुपतर्फे वसंतराव घाटगेंची जयंती उत्साहात, कंपन्यांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा गौरव !उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागरमहापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकशक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!

जाहिरात

 

केपी, एवाय पाठोपाठ राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या शर्यतीत आर.के.पोवार !

schedule07 May 22 person by visibility 991 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून आपले नाव वगळावे अशी भूमिका मांडल्यानंतर त्या जागेसाठी आता कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून इच्छुक फिल्डिंग लावत आहेत. माजी आमदार के पी पाटील व, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए‌.वाय. पाटील यांनी राजपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी प्रयत्न सुरू केले असतानाच आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी महापौर आर. के. पोवार यांचे नावे पुढे आले आहे. कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अधिकृतपणे तशी मागणी करण्यात आली. माजी महापौर आर के पवार यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळावी, राज्यपाल कोट्यातून राष्ट्रवादीकडून पोवार यांना विधान परिषदेवर नियुक्ती करावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटण्याची भूमिका ही कार्यकर्त्यांना बैठकीत मांडली. शनिवारी विक्रमनगर येथे शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष जहिदा मुजावर यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत शनिवारी सात मे रोजी राष्ट्रवादीची बैठक झाली. शहराध्यक्ष आर के प़ोवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पक्षाचे कार्यकर्ते निरंजन कदम व महिला कार्यकर्त्या सुरेखा कांबळे यांनी बैठकीत आर.के . पोवार यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम संधी मिळावी अशी उघडपणे भूमिका मांडली. यासंबंधी आमदार-खासदारांना मेल करणे व पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्याने सांगितले. त्यानंतर बोलताना शहराध्यक्ष आर.के. पोवार म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रात शहराध्यक्ष म्हणून सर्वाधिक काळ मी काम केले आहे कारण माझा प्रामाणिकपणा व पक्षश्रेष्ठींचा विश्वास यामुळे मला काम करा संधी मिळाली कोल्हापुरात राष्ट्रवादी म्हटले की आर के पोवार असे समीकरण आहे. पक्षाकडून मला जी जबाबदारी देण्यात येईल ते सांभाळण्यास मी समर्थ आहे. दरम्यान पक्षाचे सरचिटणीस सुनील देसाई यांनी स्वागत केले महादेव पाटील यांनी आभार मानले या बैठकीत राष्ट्रवादी युवती अध्यक्षपदी पूजा साळुंखे व कोल्हापूर उत्तर महिला अध्यक्षपदी मीनाक्षी डोंगर साने यांची निवड झाली. बैठकीला राजाराम पाटोळे राजू मालेकर सुमन वाडेकर बबन कांबळे निशिकांत सरनाईक सोमनाथ सोमनाथ खामकर शितल तिवडे, प्रशांत पाटील, संध्या भोसले गणेश जाधव धनश्री जाधव विक्रम साळुंखे सुरेखा सावंत आदी उपस्थित होते. दरम्यान शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला स्थायी समितीचे माजी सभापती राजू लाटकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आदिल फरास उपस्थित नव्हते. दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदार की साठी कोल्हापूर जिल्ह्यातून माजी आमदार के पी पाटील व जिल्हाध्यक्ष पाटील ए वाय पाटील या दोघांनीही यापूर्वी प्रयत्न सुरू केले आहेत राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांनी राजपाल निलांबरी न्यू आमदारकीसाठी प्रयत्नशील आहेत. यामध्ये आता आर के पवार यांचे नाव चर्चेत आल्याने आर के पवार यांचे नाव चर्चेत आल्याने राष्ट्रवादीत विधान परिषदेसाठी दिसत आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes