प्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
schedule09 May 25 person by visibility 146 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे माजी प्रमुख तथा ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. जगन कराडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रविवारी (११ मे २०२५) सकाळी १०.३० वाजता येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. जगन कराडे गौरव समितीच्यावतीने देण्यात आली आहे. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. आनंद कुमार यांच्या हस्ते प्रा. कराडे यांचा सत्कार करण्यात येईल. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. विवेक कुमार यांचे ‘सोशिऑलॉजी ऑफ प्रॉब्लेम्स अँड पेन्स ऑफ अदर्स’ या विषयावर विशेष व्याख्यान होईल. कार्यक्रमाला धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. जयश्री एस. आणि शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे माजी प्रमुख प्रा. एस.एन. पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे.