घाटगे ग्रुपतर्फे वसंतराव घाटगेंची जयंती उत्साहात, कंपन्यांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा गौरव !
schedule09 May 25 person by visibility 424 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : घाटगे ग्रुपचे संस्थापक वसंतराव घाटगे यांची जयंती (९ मे) उत्साहात साजरी करण्यात. घाटगे ग्रुपमध्ये हा दिवस "फाउंडर्स डे" म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वसंतरावांच्या प्रतिमेचं घाटगे कुटुंबियांच्यावतीने पूजन करण्यात आलं. घाटगे ग्रुपमधील कंपन्यांना गेल्या वर्षभरात अनेक पुरस्कार मिळाले. या कंपन्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले.
याप्रसंगी बोलताना घाटगे ग्रुपचे चेअरमन मोहन घाटगे म्हणाले, ‘कै वसंतराव घाटगे यांनी व्यवसाय सुरू करतांना ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून काम केलं. त्याचाच परिणाम म्हणून अनेक व्यवसाय घाटगे ग्रुपने सुरू केले. सर्व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांसाठी जे योग्य असेल ते द्यावं, जेणेकरून व्यवसाय वृद्धी होत राहील. यापुढेही सर्व कर्मचाऱ्यांनी आणखी उत्तम काम करावे.’ यावेळी घाटगे ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश घाटगे, तेज घाटगे, साधना घाटगे, नंदिनी घाटगे, माई ह्युंदाईचे डायरेक्टर दिग्विजय राजेभोसले उपस्थित होते. राजन गुणे यांनी सूत्रसंचालन केले.
…………………………….
घाटगे ग्रुपची सामाजिक बांधिलकी
घाटगे ग्रुप नेहमीच व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आला आहे. कै. वसंतराव घाटगे यांचं मूळ गाव असलेल्या हसूरचंपू (गडहिंग्लज) येथील शैक्षणिक संस्थेला घाटगे ग्रुपच्या वतीने आज देणगी देण्यात आली. शाहू ब्लड बँक, इंडियन रेडक्रॉस सोसायटी व रोटरी क्लबच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. या उपक्रमाला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. घाटगे ग्रुप कंपन्यांच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यालयात "फाउंडर्स डे" विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.