महापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक
schedule09 May 25 person by visibility 29 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आगामी काळात आपल्या प्रभागात नागरिकांच्यासाठी आवश्यक गोष्टी, उपक्रम, शिबिरे राबण्याचे आवाहन केले. आगामी काळात सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, आरोग्य कक्ष मुख्यमंत्री सहायता पेक्षा या माध्यमातून आरोग्याची मदत आपल्या प्रभागात करावी. आगामी महापालिकेत भाजपाला मोठे यश मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने कार्यरत राहून पक्ष कार्यात सज्ज रहावे असे आवाहन केले.
प्रदेश सचिव महेश जाधव यांनी मंडल अध्यक्षांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातील आज-माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, अन्य पक्षातील उमेदवार यांचा प्रभाग निहाय आढावा घेतला. जिंकण्याची जिद्द ठेवून सातत्याने मतदारसंघात कार्य राहिल्यास सध्याच्या पैशाच्या राजकारणामुळे आपला सर्वसामान्य कार्यकर्ता विजय होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला. भाजपा पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी असून जास्तीत जास्त कार्यकर्ते नगरसेवक होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाराणी निकम, माजी नगरसेवक विलास वास्कर, राजसिंह शेळके, माधुरी नकाते, किरण नकाते, डॉ. राजवर्धन, गायत्री राऊ, गिरीश साळोखे आदी उपस्थित होते