Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेजमध्ये विवेक वार्षिक अंकाचे प्रकाशनखासगी क्लासेस-लॉजिंगसह दुकानांची तपासणी होणार, आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेशसेवा ज्येष्ठ शिक्षकांवरील अन्यायविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, सीईओंना निवेदनगोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन, ३२४ ठराव दाखलगोकुळच्या निवडणुकीत संचालकपदाच्या चार जागा, एक वर्ष चेअरमनपद हवे- आमदार शिवाजीराव पाटील भाजपचे 1431 ठराव ! गोकुळच्या संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ !! खासदार धनंजय महाडिकगोकुळमध्ये अरुण नरके गट भाजपसोबत,  महाडिकांशी दोस्ताना कायमशहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशीलकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे निमशिरगावमध्ये शंभरहून अधिक वृक्षांची लागवड

जाहिरात

 

सेवा ज्येष्ठ शिक्षकांवरील अन्यायविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, सीईओंना निवेदन

schedule29 Jun 26 person by visibility 56 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : टीईडी, सीटीईटी उत्तीर्ण पात्रता असूनही सेवा ज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीमध्ये डावलले जात आहे. हा  सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर होत असलेला अन्याय दूर करावा व २०१३ पूर्वीच्या सेवेतील शिक्षकांसाठी स्वतंत्र  टीईटी परीक्षा घ्यावी या मागीसाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना प्रणित महाराष्ट्र टीईटी –सीटीईटी उत्तीर्ण सिनीअर शिक्षक कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन दिले. सिनीअर शिक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नासंबंधी चर्चा केली. सोमवारी, २९ जानेवारी २०२६ रोजी हे आंदोलन झाले. या मागाण्याबाबत राज्य सरकारकडून लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय व्हावेत अन्यथा  भविष्यात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा देण्यात आला. कृती समितीचे प्रसाद पाटील,  रविकुमार पाटील, गौतम वर्धन, एस के पाटील, शारदा वाडकर, सुकुमार पाटील , संदीप पाडळकर , मंगेश धनवडे , विशाल प्रभावळे , श्वेता खांडेकर, मधुकर मुसळे , तानाजी पाटील, वृषाली पाटील, नकुशी देवकर, सीमा देसाई, शिवानी कानकेकर, वेला खाडे, अर्चना माने, निर्मला तिगाडे, संपदा यादव, रंगराव वाडकर, शंकर पवार,अरुण पाटील आदींचा सहभाग होता. टीईटी पेपर फु्टीमुळे परीक्षेला बसलेल्या शिक्षकांची मानसिकता बिघडली असल्याने सेवेतील शिक्षकांना उत्तीर्णतेची अट चाळीस टक्के करावी व पेपर फुटीची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes