राहुल गांधीच्यांवरील कारवाईचा कागलमध्ये निषेध
schedule26 Mar 23 person by visibility 734 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यांच्या विरोधात कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कागल एस टी स्टँड येथे मोर्चाकडून भाजप सरकारचा निषेध केला.
यावेळी केडीसीसी बँक संचालक प्रताप माने यांनी टीका केली आहे.राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आला असल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी प्रकाश गाडेकर म्हणाले, देशात प्रचंड बेरोजगारी महागाई असताना भाजप सरकार द्वेषाचे राजकारण करत आहे याचा त्यांनी जाहीर निषेध व्यक्त करत देशात हुकूमशाहीचे राजकारण चालू आहे. असे ते म्हणाले.
कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक नितीन दिंडे, नगरसेवक विवेक लोटे, जेष्ठ नेते नवल बोते, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, माजी उपनगराध्यक्ष संजय ठाणेकर,युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष सागर गुरव, सुनील माने, अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पंकज खलीफ, माजी उपनगराध्यक्ष सुनिल माळी, संजय फराकटे,सागर दावणे, संदीप भुरले, सुनिल कदम, नवाज मुश्रीफ, इरफान मुजावर,मेघा वाघमारे, दिग्विजय डुबल,पंकज घुले, प्रशांत घाटगे,राहूल माने, प्रदिप रजपूत,ढोबळे, विक्रम कामत, सुहास सणगर,अंकुश नाईक, अमोल सोनुले,सुरज खोत,प्रदीप माळकर उपस्थित होते.