कोल्हापुरात शुक्रवारी रंगणार प्रिय शिरीष मैफल, विश्वजीत बोरवणकर, पारुल मिश्रांचे सादरीकरण
schedule24 Jun 26 person by visibility 20 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजक शिरीष सप्रे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी, २६ जून २०२६ रोजी ‘प्रिय शिरीष’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गायक विश्वजीत बोरवणकर, गायिका पारुल मिश्रा हे हिंदी सिनेमातील गाण्यासह सुफी गीते सादर करणार आहेत. शिरीष सप्रे फाऊंडेशनतर्फे सायबर संस्थेच्या आनंद भवन येथे हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. कलाप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फाऊंडेशनतर्फे सुस्मिता सप्रे, आदित्य जाधव आणि राजसी जाधव यांनी केले आहे.