Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद स्थायी समिती सभामाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्यापुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलनऑनलाइन संचमान्यतेच्या विरोधात घुमला पाच जिल्ह्यातील शिक्षकांचा आवाज, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संघटित शक्तीचे दर्शनकोल्हापुरात शुक्रवारी रंगणार प्रिय शिरीष मैफल, विश्वजीत बोरवणकर, पारुल मिश्रांचे सादरीकरणहिल रायडर्सची यंदा अमृतमहोत्सवी पन्हाळा - पावनखिंड पदभ्रमंती मोहीम, चार जुलैला सुरुवातब्राह्मण पुरोहित संघातर्फे पुरस्कार वितरण, विद्यार्थ्यांचा गुणगौरवपुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी महामंडळ करणार सरकारकडे पाठपुरावा, फेब्रुवारीत मराठी चित्रपट संमेलनअजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाणांची बदलीबांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

जाहिरात

 

ब्राह्मण पुरोहित संघातर्फे पुरस्कार वितरण, विद्यार्थ्यांचा गुणगौरव

schedule24 Jun 26 person by visibility 19 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रातील मुलांचा सत्कार करण्यात आला. दिव्यांग व दृष्टीहीन विद्यार्थ्यांना गौरविले. शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या समारंभात अॅस्टर आधार हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय देशपांडे, आनंदी फाऊंडेशनचे संस्थापक आनंद बनसोडे, योगशिक्षिका सुचित्रा निंबाळकर यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती नगरसेविका दीपा ठाणेकर, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, संघाचे अध्यक्ष प्रसाद निगुडकर, उपाध्यक्ष सचिन पितांबरेयांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. संघाचे सचिव नीलेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. निखिल शेंडूरकर व तनुजा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संचालक विशाल जोशी, स्वप्नील मुळये, स्वप्नील जोशी, ओंकार खाडीलकर, अतुल द्डीकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes