Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !डिबेंचर्सच्या रकमेबाबत दूध संस्थांना अपेक्षित निर्णय होईल – हसन मुश्रीफकलाकार आहेत म्हणून समाज आहे- प्रकुलगुरू ज्योती जाधवभैया मानेंना काँग्रेसचाच पर्याय,  महायुतीच्या भांडणात उमेदवारीच्या लॉटरीची शक्यता कमी - सतेज पाटीलप्रा.. शशिकला सरगर यांना महाराणी ताराराणी पुरस्कार प्रदानताराराणी महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन, सासने मैदान येथे महोत्सव गोकुळकडून आईस्क्रीम निर्मिती, विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध ! रविवारी शुभारंभ!!कोल्हापूर फर्स्ट पोहोचले दिल्लीत ! केंद्रीय मंत्र्यांच्यासोबत रेल्वे- रस्ते- पर्यटनासंबंधी चर्चा !!सुर्यकांत पाटलांचा बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा

जाहिरात

 

काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी इंद्रजीत बोंद्रे

schedule27 Jan 26 person by visibility 263 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांची निवड झाली. बोंद्रे हे दुसऱ्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 

 पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अर्हता नियम १९८७ मधील नियम तीन नुसार काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली. यात काँग्रेसच्या गटनेतेपदी  बोंद्रे यांची एकमताने निवड केली. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, सहआयुक्त चंद्रकांत खोसे व उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत गटाची नोंदणी करण्यात आली. बोंद्रे हे प्रभाग ८ मधून विजयी झाले आहेत. आक्रमक अन अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. आई शोभा बोंद्रे यांनी याआधी महापौरपद भूषवले  आहे.  दरम्यान  खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक ३४ नगरसेवक निवडूण आले आहेत. सत्तेपर्यंत जाण्यासाठी त्यांना काही जागा कमी पडल्या असल्या तरी महापालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला मान मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावण्याठी काँग्रेसने आक्रमक व तरुण चेहऱ्याला बोंद्रे यांच्या रुपाने संधी दिल्याचे मानले जाते. 

यावेळी राजेश लाटकर, संजय मोहिते, अर्जून माने,  दुर्वास कदम,  प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, सुभाष बुचडे,  विनायक कारंडे,  विशाल चव्हाण, जयश्री चव्हाण ,  स्वाती यवलुजे, रुग्वेदा माने, रुपाली पोवार, दिपाली घाटगे पुष्पा नरुटे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

"खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आ जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपति, ऋतुराज पाटील, यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी केलेली निवड मी माझ्या कामातून सार्थकी लावेल. कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही प्रशासन व सत्ताधाऱ्यांना नक्की सहकार्य करु. पण जिथे चुकीचे प्रकार घडतील तेथे मात्र, कडाडून विरोध राहील. सर्वसामान्य कोल्हापुरकरांना मुलभूत सुविधा देण्यासाठी आमचा आवाज सदैव बुलंद राहील. त्यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका पार पाडू. "

- इंद्रजित बोंद्रे, गटनेता, काँग्रेस, कोल्हापूर महापालिका.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes