सुटा कोल्हापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी आर.जी.कोरबू ! कार्यवाहपदी प्रा.गजानन चव्हाण, उपाध्यक्षपदी सयाजी पाटील, मानाजी शिंदे !!
schedule26 Mar 23 person by visibility 239 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ, कोल्हापूर जिल्हा शाखेच्या (सुटा) अध्यक्षपदी डॉ.आर.जी.कोरबू, कार्यवाहपदी डॉ. गजानन चव्हाण, उपाध्यक्षपदी प्रा. सयाजी पाटील, प्रा. मानाजी शिंदे निवडून आले. २०२३-२४ ते २०२४-२५ या कालावधीीसाठी पदाधिकारी निवडी झाल्या.
सुटा कोल्हापूर जिल्हा शाखेच्या विविध पदासाठी रविवारी (२६ मार्च ) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान झाले. अंबाई डिफेन्स येथील सुटा मध्यवर्ती कार्यालयात ही निवडणूक झाली. १६४ सभासद मतदारांनी यामध्ये सहभाग घेतला. अध्यक्षपदासाठी प्रा.आर.जी. कोरबू, प्रा. आर. के. दिवाकर , प्रा पांडुरंग फराकटे यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये प्रा. कोरबू विजयी झाले. कोरबू यांना १०० मते, तर दिवाकर यांना ५९ व फराकटे यांना तीन मते मिळाली. कार्यवाह पदासाठी प्रा. गजानन चव्हाण व प्रा. पांडुरंग फराकटे यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये चव्हाण यांना १४८ तर फराकटे यांना पंधरा मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या लढतीत प्रा. सयाजी पाटील (१२७), प्रा. मानाजी शिंदे (९९) हे दोघे विजयी झाले. तर प्रा. पांडुरंग फराकटे यांना ५४ मते मिळाली. खजानिसपदी प्रा.विजय देसाई यांची बिनविरोध निवड झाली