Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिका अधिकाऱ्यांची कमाल, टाकावूतून टिकाऊ !  भंगारातील आरसी वाहनांचे ट्रकमध्ये रुपांतर ! !शिवकाळातील इतिहासाला वंदन करत सह्याद्री प्रतिष्ठानची पदभ्रमंती मोहीम, वाड्यावस्त्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपकोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी मंत्रालयात सामंजस्य करार, ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम होणारजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनय प्रकाशदिप योजना- सभापती शीतल यादव  इंडिया आघाडीतर्फे शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने, निवेदन स्वीकारण्यास प्रशासनाचा नकारथायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा

जाहिरात

 

शिवकाळातील इतिहासाला वंदन करत सह्याद्री प्रतिष्ठानची पदभ्रमंती मोहीम, वाड्यावस्त्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

schedule21 Jul 26 person by visibility 30 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवशाहीर रंगराव पाटील यांच्या दमदार आवाजातील पोवाडे, मर्दानी खेळाची थरारक प्रात्यक्षिके व वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, अशा वातावरणात सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे काढण्यात आलेली पन्हाळा ते पावन परिसर पदभ्रमंती मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली. मोहिमेत सुमारे ४१० मोहिमवीरांनी सहभाग घेतला. प्रतिष्ठानचे चिफ पेट्रन संभाजीराजे छत्रपती व संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.

नेबापूर येथील वीररत्न शिवा काशीद यांच्या समाधीचे पूजन केल्यानंतर नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तुलनाकार डॉ. आनंद पाटील यांनी खरा इतिहास शोधण्यासाठी विविध भाषांमधील परकीय साधनांचा कसा वापर करावा, याबाबत मार्गदर्शन केले. पन्हाळा नगराध्यक्ष जयश्री पोवार, माजी नगरसेवक आसिफ मोकाशी, राजेंद्र बांदल, सुनील पसारे यांनी मोहिमवीरांना शुभेच्छा दिल्या.
तुरुकवाडी, म्हाळुंगे, मसाई पठार, वरेवाडी, कुंभारवाडी, खोतवाडी, मांडलाईवाडीमार्गे करपेवाडी येथे मोहिमवीरांचा मुक्काम होता. नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात शाहीर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे सादर केले. दुसऱ्या दिवशी रिंगेवाडी, माळवाडी, पाटेवाडी, सुकामाचा धनगरवाडा, म्हालसवडेचा धनगरवाडा, माणचा धनगरवाडा मार्गे माेहिमवीर पांढरेपाणी येथे पोहोचले. येथून बारबंदी पोशाखातील मावळ्यांनी फुलांनी आकर्षक सजविलेल्या पालखीतून शिवछत्रपतींच्या मूर्तीची मिरवणूक काढली. प्रतिष्ठानचे सदस्य व इतिहास अभ्यासक मानसिंग चव्हाण यांनी फरसबंदी मार्गाची माहिती देत घडलेल्या इतिहासावर प्रकाश टाकला. प्रशांत बांदल यांनी बांदल मावळ्यांच्या बलिदानाची माहिती दिली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे, सचिव प्रविण हुबाळे, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, प्रदीप थोरवत, सुखदेव गिरी, किरण चाबूकस्वार, प्रवीण केंबळे, सुजित जाधव, चेतन बिरंजे, राजेंद्र काटकर, रोहन भोगले, शुभम कोळी, योगेश वेटाळे, अभिजित कोळी, भोलानाथ काटवे, सागर पाटील, पार्थ जाधव, कुणाल फराकटे, केतन कांबळे, पवन निपाणीकर, अक्षय पाटील यांनी संयोजन केले.
--------------------
कुंभारवाडी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना गुणपत्रके, प्रमाणपत्रे ठेवण्यासाठी फाईल, तर वरेवाडीतील विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. पाटणे येथील रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालयात मोठ्या वह्या व विद्यामंदिर आंबर्डे येथे एक हजार लीटरची पाण्याची टाकी भेट देण्यात आली.


 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes