+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Apr 24 person by visibility 47 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : आशयघन कथानक, उत्तम अभिनय आणि श्रवणीय संगीत असलेला आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला ‘परंपरा’हा सिनेमा २६ एप्रिल २०२४ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या सुत्रावर हा सिनेमा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल असे या सिनेमातील कलाकार मिलिंद शिंदे व दिग्दर्शक प्रणय निशिकांत तेलंग यांनी सांगितले.
या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार व तंत्रज्ञ, मंगळवारी (२३ एप्रिल) कोल्हापुरात होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘परंपरा हा सिनेमा हा केवळ मनोरंजनच नाही तर आजच्या बदलत्या जगात वारसा आणि परंपरेचे महत्व दर्शविणारा आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचे जगणं, सामाजिक ताण याचं दर्शनही हा सिनेमा घडवतो.
हरिश कुमार आणि अँड्रयू रिबेलो यांच्या स्टार गेट मुव्हीज निर्मिती संस्थेतंर्गत परंपरा सिनेमाची निर्मिती केली आहे. फैजल पोपरे हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. अभिनेते मिलिंद शिंदे,अभिनेत्री वीणा जामकर, प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण धाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवगंत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. सिनेमाची पटकथा प्रणय निशिकांत तेलंग आणि संजय सावंत यांची आहे.