
एचएसबीसी या राष्ट्रीय कंपनीमध्ये निवड
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या सहा विद्यार्थीनींची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रमानांकित हाॅगकाॅंग शांघाय बॅंकिग कार्पोरेशन (एच्.एस्.बी.सी.) या कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी व अभियांत्रिकीचे संचालक डॉ. मोहन वणरोट्टी यांनी दिली. निवड झालेल्या या सर्व विद्यार्थिनींचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.निवड झालेल्या विद्यार्थींनीनां वार्षिक तब्बल 9 लाखाचे पॅकेज कंपनीने दिले आहे.
एचएसबीसी या नामांकित कंपनीने खास विद्यार्थीनींसाठी हा कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करण्यात आला होता. या मुलींना ऍप्टिट्यूड टेस्ट, सायकोमेट्रिक टेस्ट, टेक्निकल टेस्ट, तांत्रिक ज्ञान मुलाखत व एचआर मुलाखत अशा पाच खडतर टप्प्यांतून जावे लागले. अंतिम निकालामध्ये केआयटीच्या यज्ञा सुहास जोशी, संजना गणेश सावंत, दिपाली कृष्णा पाटील, सेजल गजानन यादव, शिवानी जितेंद्र शिराळे आणि श्रेयाप्रकाश शेलार या सहा विद्यार्थींनींची निवड एच्. एस्. बी. सी. या कंपनीने केली आहे. *हि निवड सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून संख्येने व पॅकेजने सर्वाधिक आहे.
महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डाॅ.अमित सरकार, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरींग विभाग प्रमुख डाॅ. अजित पाटील,ट्रेनिंग प्लेसमेंटचे विभाग समन्वयक प्रा.चैतन्य पेडणेकर आणि प्रा.विनय प्रभावळकर यांचे विद्यार्थीनींना सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चैगुले, कार्यकारी संचालक डाॅ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, संचालक डाॅ.मोहन वनरोट्टी व रजिस्ट्रार डाॅ. एम्. एम्. मुजुमदार यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले