Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मानएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा .विलास  नांदवडेकर  ग्रामीण भागांशी जोडलेलं, अनुभवी नेतृत्व ! रामचंद्र भोगमांची उमेदवारी दूध उत्पादकांना वाटतेय आपली !!मराठी अध्यापक संघातर्फे दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलनशेतकऱ्यांचा आवाज गोकुळमध्ये उमटणार, समविचारीतून बाबासाहेब देवकरांच्या उमेदवारीला उत्पादकांची पसंतीके.जी. पाटील यांना पत्नीशोकगोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास कात्यायनी परिसरात अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार - आमदार सतेज पाटीलअभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापटयुवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन

जाहिरात

 

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा .विलास  नांदवडेकर 

schedule01 Oct 26 person by visibility 64 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ, मुंबईचे प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास दत्तू नांदवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू कर्नल प्रा. (डॉ.) हेमलता बागला यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.

विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजात सातत्य, समन्वय आणि गतिमानता राखण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. नांदवडेकर हे विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची जबाबदारी सश सांभाळत असून, विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठ हे भारतातील तसेच दक्षिण-पूर्व आशियातील पहिले महिला विद्यापीठ असून, महिला शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यापीठाची ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सध्या विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी प्रा. बागला यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वात विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामांना तसेच महत्त्वपूर्ण प्रकल्पांना सरकारसोबत समन्वय साधून गती देण्यात येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.  यापूर्वी नांदवडेकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणूनही त्यांनी पाच वर्ष काम पाहिले. ते मूळचे चंदगड तालुक्यातील आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes