Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कारअन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनग्रामपंचायतीकडूनच अपार्टमेंटमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन ! राजू मानेंचा आरोप,  आंदोलनाचा दिला इशारा !!गोकुळ निवडणूक- सतेज पाटलांचा धडाका, भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेटजिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा - सदस्यांची अध्यक्षांच्याकडे मागणीनरेंद्र मोदी विचारमंचच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पूनम तोडकरजुनी पेन्शनसाठी एक सप्टेंबरपासून शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलनभरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड शिक्षकांचा एकच निर्धार, कौस्तुभ गावडेंना आमदार करुन विधानपरिषदेत पाठविणारराज्यभरातील व्यापार -व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची पणनमंत्र्यांच्यासोबत चर्चा ! बाजार समिती पदाधिकारी व्यापाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक!!

जाहिरात

 

अन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन

schedule27 Aug 26 person by visibility 171 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अन्यायकारक संच मान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी, (३१ ऑगस्ट २०२६) कोल्हापुरातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनाचा इशारा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी दिला आहे. गावडे यांनी म्हटले आहे, ‘ शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांची संख्या, विषयांची आवश्यकता, उपलब्ध तासिका व शैक्षणिक कामकाजाचा योग विचार न करता होत असलेली अन्यायकारक संच मान्यता  ही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम करणारी आहे.संच मान्यतेच्या प्रक्रियेत वस्तुस्थितीचा योग्य विचार न झाल्यामुळे अनेक ठिकाणी कार्यरत शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या सेवासुरक्षेचा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि संस्थांच्या प्रत्यक्ष गरजांचा विचार  करुन संच मान्यता  प्रक्रिया पारदर्शक व न्यायपद्धतीने करावी. अन्यायकारक संचमान्यता तातडीने रद्द करुन वस्तुनिष्ठ निकषावर फेरआढावा घ्यावा.तसेच कार्यरत शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. या मागण्यांची तातडीने सकारात्मक दखल न घेतल्यास सोमवारी, अकरा वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन केले जाईल.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes