Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ निवडणूक- सतेज पाटलांचा धडाका, भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेटजिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा - सदस्यांची अध्यक्षांच्याकडे मागणीनरेंद्र मोदी विचारमंचच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पूनम तोडकरजुनी पेन्शनसाठी एक सप्टेंबरपासून शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलनभरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड शिक्षकांचा एकच निर्धार, कौस्तुभ गावडेंना आमदार करुन विधानपरिषदेत पाठविणारराज्यभरातील व्यापार -व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची पणनमंत्र्यांच्यासोबत चर्चा ! बाजार समिती पदाधिकारी व्यापाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक!!वीज कामगारांचे हाल करण्यासाठी मेस्माची चाल सरकारने वापरली का? कामगार संघटनेचा सवालसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपुरात लोकनृत्य महोत्सवबाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !

जाहिरात

 

नरेंद्र मोदी विचारमंचच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पूनम तोडकर

schedule27 Aug 26 person by visibility 25 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पूनम तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच महिला युवकांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करणार असल्याचा निर्धार तोडकर यांनी व्यक्त केला. तोडकर या गेली अनेक  वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. महिला बचत गट सक्षमीकरण, सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी त्या काम करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककलंकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करणार आहोत असे त्यांनी सांगितले याशिवाय रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी शिबिरे शैक्षणिक उपक्रम महिला व युवकासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातील असेही त्या म्हणाल्या जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवणुकीला  प्राधान्यक्रम राहील असे त्या म्हणाल्या. पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्या पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी शुभांगी गुरव उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes