Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अनेक दिवसांचे स्वप्न साकारण्याच्या मार्गावर…आयटी पार्कसाठी शेंडापार्कमध्ये ३४ हेक्टर जागा मंजूरशहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे निसर्गदूत पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण समारंभअर्जुनवाडा येथे रंगणार सुपर मॉम स्पर्धासंत तुकारामांचे अभंग हे केवळ भक्तीपर नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन – डॉ. जी. पी. माळीशाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहूंचे स्मारक, कापड पर्यटन केंद्रही उभारणारमुश्रीफ –कोरेंच्यामध्ये ऑल इज नॉट वेल…एकेकाळच्या मित्रांत वाढतेय राजकीय अंतर !जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकमत होईना, जिप अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टातसरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात कोर्टात आव्हान, दोन एप्रिलला सुनावणीदुधाळ जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना -  चेअरमन नविद मुश्रीफशिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पानंतर व्यापक बैठक

जाहिरात

 

शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे निसर्गदूत पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण समारंभ

schedule06 Mar 26 person by visibility 189 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि निसर्गप्रेमाची जाणीव समाजात रुजवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘निसर्गदूत पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्रदान करण्यात येणार आहे. ७ मार्च २०२६ रोजी हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. हा कार्यक्रम राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथील स्वप्नपरी सभागृह येथे सकाळी ११ वाजता होत आहे.

 पुरस्कार सोहळ्यात चांगुलपणाच्या चळवळीचे अध्यक्ष राज देशमुख आणि जागतिक शिक्षणतज्ज्ञ तसेच शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

    यंदाच्या वर्षी  पत्रकार संदीप आडनाईक, बांबू रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक पाटलोबा पाटील, आपत्कालीन जीवरक्षक व माजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिनकर कांबळे, जंगल अभ्यासक दत्ता मोरसे ,वृक्षमित्र वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अमोल बुढढे ,वन्यजीव अभ्यासक विजय पाटील,निसर्गमित्र अनिल चौगुले,निसर्गमित्र राणीता चौगुले, जीवरक्षक आणि निसर्ग संवर्धक बबिता जाधव  यांची ‘निसर्गदूत पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, वन्यजीव अभ्यास, आपत्ती व्यवस्थापन तसेच समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी या सर्व मान्यवरांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे शहीद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes