Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दुधाळ जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना -  चेअरमन नविद मुश्रीफशिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पानंतर व्यापक बैठक श्रीशैल देवस्थानात सोळा ते वीस मार्च दरम्यान उगादी महोत्सव जिल्ह्यात सोळा मार्चपासून विशेष हेल्मेट तपासणी मोहीम, नो हेल्मेट - नो एट्री जात प्रमाणपत्रे खोटी, नगराध्यक्षसह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेविकेंवर गंभीर आरोप, नऊ मार्चला कोल्हापुरात मोर्चाकळंबा तलावात कचरा, टाकाऊ वस्तू, खरमातीचा ढिगारा ! कळंबा -पाचगाव ग्रामपंचायतीचे पूर्णत: दुर्लक्ष!!कैलासगडची स्वारी मंदिर पालखी सोहळा दिमाखातजुनी पेन्शनसाठी साखळी उपोषण : शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनजिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव ! यड्रावकर गट शिवसेनेसोबतच!! कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे 

जाहिरात

 

दुधाळ जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना -  चेअरमन नविद मुश्रीफ

schedule04 Mar 26 person by visibility 33 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या विविध योजना राबविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा गोकुळने सलंग्न दूध उत्पादकांच्या दुधाळ जनावरांसाठी (गाय/म्हैस) हवामान (तापमान व पर्जन्यमान) आधारित पॅरामेट्रिक विमा योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने संचालक मंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण योजनेवर चर्चा करण्यात आली. हवामानातील बदलामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादनात घट येते. त्यामुळे उत्पादकांना आर्थिक फटका बसतो. हे संभाव्य नुकसान कमी करण्याच्या उद्देशाने गोकुळ दूध संघामार्फत दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीशी सातत्याने पाठपुरावा व सकारात्मक संवाद साधण्यात आला. संघाच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देत कंपनीने हि योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे. ही योजना एक वर्ष कालावधीची असून उन्हाळा व पावसाळा या दोन्ही हंगामांचा त्यात समावेश आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंद झाल्यास तसेच पावसाळ्यात संबंधित तालुक्यात ९० ते १४० मिली मीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यास विमा संरक्षण लागू होईल. निश्चित निकषांनुसार नुकसान झाल्यास प्रतिदिन प्रति जनावर ५०० रुपये इतकी भरपाई विमा कंपनीमार्फत दिली जाईल.

          या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रति जनावर एक वर्षासाठी २० हजार रुपयांचा विमा उतरविणे बंधनकारक आहे. वार्षिक २३६ रुपये (२०० रुपये विमा हप्ता + ३६ रुपये जीएसटी) इतका हप्ता आकारण्यात येणार आहे. दूध उत्पादकांच्या गोठ्यातील जनावरांच्या संख्येनुसार विमा संरक्षण दिले जाईल. ही योजना ऐच्छिक असून या योजनेचे सविस्तर माहितीचे परिपत्रक प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगून या योजनेमध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन चेअरमन मुश्रीफ यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes