न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.४९ टक्के
schedule22 May 24 person by visibility 432 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९९.४९ टक्के लागला. मधुरिमा पाटील विज्ञान शाखेत तर वाणिज्य शाखेत मयंक छाबडा प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाले आहेत.सायन्स विभागातून एकूण ४९९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. यामध्ये ४३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवल६े. १३२ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये तर २७९ विद्यार्थी व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या विभागात मधुरिमा अशोक पाटीलने ६०० पैकी ५६३ गुण (९३.८३ टक्के) कॉलेजमध्ये प्रथम आली आहे.
वाणिज्य शाखेतून १०१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होते. त्यामधील १४ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर ३५ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण आहेत. वाणिज्य विभागातून मयंक विनोदकुमार छाबडाने ६०० पैकी ५४६ गुण (९१ टक्के) मिळवून कॉलेजमध्ये प्रथम आला आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिव व कॉलेजच्या प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.