Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सचिन शिरगावकर यांना उद्योगरत्न पुरस्कार, डॉ. आनंद देशपांडेंच्या हस्ते गुरुवारी वितरण समारंभकोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडेअंबाबाई मंदिर आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला मिळणार; कोणावरही अन्याय होणार नाहीसहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्र   शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्या कामकाजाच्या चौकशीचा अहवाल सीईओंकडे सादर, ३८ पानी अहवालप्राथमिक शिक्षणाधिकारीपदी अशोक घुगे रुजूगोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंगरग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा कुलगुरू राजनीश कामत  यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कारअभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत – मेजर अभिजीत ताम्हणकर

जाहिरात

 

सचिन शिरगावकर यांना उद्योगरत्न पुरस्कार, डॉ. आनंद देशपांडेंच्या हस्ते गुरुवारी वितरण समारंभ

schedule18 Aug 26 person by visibility 29 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे एस बी रीशेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शिरगावकर यांना उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे 20 ऑगस्ट 2026 रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होत आहे. पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेडचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. हॉटेल सयाजी येथे दुपारी अडीच वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे कोल्हापूर वेस्ट रीजन हेड योगेश देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. उद्योग क्षेत्रामध्ये कोल्हापूरचे नाव जागतिक पातळीवर पोहोचणाऱ्या उद्योजकांना दरवर्षी सॅटर्डे क्लबतर्फे उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सॅटर्डे क्लबचे कोल्हापुरातील यंदाचे दहावे वर्ष आहे. यंदाच्या समारंभासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ अजित मराठे यांची प्रमुख उपस्थिती असेल. याप्रसंगी डेप्युटी जनरल सेक्रेटरी महेश इनामदार, जनरल सेक्रेटरी सुहास फडणीस, कौन्सिल ऑफ ॲडव्हायझर्स विशाल मंडलिक, डेप्युटी रीजन हेड अमेय गोडे, दिग्विजय दापके,  कुलदीप कोरगावकर, सुषमा धर्माधिकारी, डॉ. संदीप पाटील, जितेंद्र रणनवरे, किशोर पवार, आनंद मोहन साळुंखे,  नरेंद्र जोशी आणि कविता केदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व मानचिन्ह असे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes