Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सचिनच्या प्रचारार्थ आबाजींचा झंझावात! मतदारांत विश्वास…कार्यकर्त्यांत उत्साह ! !दालन प्रदर्शन पाहण्यास गर्दी उसळली…प्रार्थना बेहरेंनी साधला संवाददि न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरायाज्ञसेनी पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवारांना विजयी करुन अशोक पाटील कुटुंबींयांना न्याय द्या : खासदार धनंजय महाडिकमाहिती विभागाचे छायाचित्रकार अनिल यमकरांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सतेज पाटील समर्थक प्रदीप झांबरेंचा भाजपमध्ये प्रवेश ! मुडशिंगीत काँग्रेसला धक्का !!सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महापालिकेसाठी महायुतीचा पद वाटपाचा फॉर्म्युला ठरला ! रविवारी अधिकृत घोषणा !!युवक - युवतींसाठी काम, महिला सक्षमीकरणाला प्राधान्य : शिवसेनेचे उमेदवार सचिन पाटीलशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी भली मोठी रांग ! कुलगुरू. आजी-माजी प्रकुलगुरु, अधिष्ठातांचा समावेश ! !

जाहिरात

 

दालन प्रदर्शन पाहण्यास गर्दी उसळली…प्रार्थना बेहरेंनी साधला संवाद

schedule01 Feb 26 person by visibility 18 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : घरकुलाचे स्वप्नं डोळयात साठवत रविवारी हजारो नागरिकांनी दालन २०२६ प्रदर्शनाला भेट दिली. क्रीडाई कोल्हापूरतर्फे आयोजित या बांधकाम विषयक प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली. वन बीएचके, टूबीएचके, थ्रीबीएचकेसह रो हाऊसेस, बंगलोजसाठी चौकशी केली. महासैनिक दरबार हॉल येथे हे प्रदर्शन भरले आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी रविवारी सायंकाळी दालन प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनातील स्टॉलला भेटी देताना त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. महिलांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढले.

क्रीडाई कोल्हापूरतर्फे ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बांधकाम विषयक दालन २०२६ चे आयोजन केले आहे. रविवारी, या प्रदर्शनाचा तिसरा दिवस. सुट्टीचे औचित्य साधत हजारो नागरिकांनी सहकुटुंब दालन प्रदर्शनाला भेट दिली. वास्तूविषयक सर्व माहिती एकाच छताखाली हे दालनचे वैशिष्ट्ये. विविध गृहप्रकल्प, व्यापारी संकुल व ऑफिसेससाठी जागा यासंबंधीची माहितीचे हे परिपूर्ण दालन नागरिकांच्या पसंतीस उतरले. शहरातील विविध भागातील वास्तू घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनात १७० हून अधिक स्टॉल आहेत. प्रदर्शनस्थळी दिवसभर गर्दी उसळली होती.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे या सायंकाळी सहा नंतर प्रदर्शनस्थळी दाखल झाल्या. चाहत्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अनेकांनी सेल्फी घेतली. अभिनेत्री बेहरे यांनी दालन प्रदर्शनाची पाहणी केली. विविध स्टॉलना भेटी दिल्या. दालन प्रदर्शनामुळे अनेकांचे घरकुलाचे स्वप्न साकार होत असल्याचे नमूद केले. क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, दालनचे चेअरमन महेश यादव, क्रीडाईचे उपाध्यक्ष चेतन वसा, प्रकाश देवलापूरकर, गणेश सावंत, संग्राम दळवी, निखिल शहा आदींनी त्यांचे स्वागत केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes