Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षकांच्या प्रश्नांना विधीमंडळात आवाज देण्यासाठी माझी उमेदवारी- प्रा. सचिन सानपलोकसंवाद-२०२६ उपक्रमांतर्गत आष्टा, कसबे डिग्रजमध्ये प्रबोधनजतमध्ये तहसीलदारांनी साधला गणेशभक्तांशी संवाद, महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षेबाबत  मार्गदर्शनमानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या उद्घाटनाने विसर्जन मिरवणूकीस सुरवातआत्मातर्फे सोमवारी रानभाजी महोत्सव सत्यजीत पाटील गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांच्या समविचारी आघाडी सोबतमहायुतीत कोणी छोटा- मोठा नाही, आम्ही सगळे जुळेभाऊ ! आमच्याकडे ४४०० ठराव, शुक्रवारी प्रचार शुभारंभ ! !महायुतीची गोकुळसाठी महाचर्चा, कोल्हापुरात एकवटले दिग्गज नेते ! जागावाटप संबंधी निर्णय होणार !!अरुण डोंगळेशी खटके, ए वाय पाटलांनी घेतली विनय कोरेंची भेटमहाविकास आघाडीचं ठरलं…शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर ! पदवीधरसाठी डॉ.हर्षदा देशमुख जाधव ?

जाहिरात

 

शिक्षकांच्या प्रश्नांना विधीमंडळात आवाज देण्यासाठी माझी उमेदवारी- प्रा. सचिन सानप

schedule26 Sep 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा, शिक्षकांच्या प्रश्नांना विधीमंडळात थेट आवाज देण्यासाठी माझी माझी उमेदवारी आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील पाचही जिल्हयांचा संपर्क दौरा केला आहे. पाठिंब्यासाठी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली आहे.’ असे प्रा. सचिन सानप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ऑक्टोबर महिन्यात पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या अनुषंगाने शिक्षक मतदार, संस्थाचालक यांच्या भेटी घेण्यासाठी सानप यांनी कोल्हापूर दौरा केला. याप्रसंगी ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. सानप हे पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आहेत. ते म्हणाले, पाचही जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत निवडणूक संकल्पपत्राची रुपरेषा मांडली आहे. शिक्षकांचा लढा केवळ रस्त्यापुरता मर्यादित न राहता मंत्रालय तसेच विधीमंडळाच्या सभागृहात कायदेशीर व धोरणात्मक मार्गाने सोडवावा लागेल. यासाठी शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असायला हवा.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes