Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

क्रिडाई कोल्हापूरतर्फे अभियंता दिनी रक्तदान शिबिर

schedule16 Sep 25 person by visibility 286 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  क्रिडाई कोल्हापूरतर्फे सर मोक्षगुडंम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिन हा अभियंता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून क्रिडाईतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात क्रिडाई कोल्हापूर चे पदाधिकारी, सभासद, युथ विंग, वुमेन्स विंग सदस्य व क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांनी रक्तदान केले.

क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड, संचालक चेतन चव्हाण, सुनिल चिले , मौक्तीक पाटील, महालक्ष्मी ब्लड बँकचे प्रमुख डॉ विजयकुमार बर्गे, क्रिडाई कोल्हापूर युथ विंग प्रणव क्षीरसागर, सभासद  विश्वजीत जाधव, संतोष पाटील,मौसीन मुल्लानी यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सभासद अनंत मुरगूडे यांनी आज अखेर ११६ वेळा, संदिप मिरजकर यांनी 30, सचिन घाटगे यांनी २६ वेळा रक्तदान केले.

 तसेच या शिबिरासाठी महालक्ष्मी ब्लड बँकचे प्रमुख डॉ विजयकुमार बर्गे व सहकाऱ्यांनी नियोजन केले. या कार्यक्रमास कारवाचे चेअरमन रत्नेश शिरोडकर, महालक्ष्मी ब्लड बँक चे प्रमुख डॉ विजयकुमार बर्गे व स्टाफ, डॉ डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या  सुपरिडेंट डॉ. वैशाली गायकवाड, क्रिडाई कोल्हापूर चे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सहखजानिस श्रीराम पाटील, सहखजानिस सागर नालंग, संचालक गौतम परमार, प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, अमोल देशपांडे, संग्राम दळवी,सुनिल चिले, क्रिडाई कोल्हापूरचे माजी अध्यक्ष महेश यादव. जेष्ठ सभासद श्रीनिवास गायकवाड, कृष्णा पाटील, श्रेयांस मगदूम, संजय डोईजड,सचिन घाटगे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes