Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
५० हून अधिक नगरसेवकांनी दिल्या काँग्रेसकडे मुलाखती ! इच्छुकांची संख्या ३२९ ! !पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी प्रा. निशा मुडे, उपाध्यक्षपदी डॉ. जगन्नाथ पाटील, सचिवपदी विश्वजीत भोसलेहौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून वसुभूमी प्रथम आजीबाईंची शाळा…!सत्वशिला साळुंखे यांचे निधन काँग्रेसकडून मुलाखती ! माजी महापौर-नगरसेवकासह पदाधिकारी, कार्यकर्ते इच्छुक ! !हसन मुश्रीफांकडून आदिल फरासांची उमेदवारी घोषितनूतन मराठी विद्यालयमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभसरोजिनी कॉलेज – अॅस्टर आधारमध्ये सामंजस्य करार, नर्सिंग कोर्स सुरू होणार त्यांना पद दिलं, महापौर केलं ! माझं काय चुकले ? सतेज पाटलांच्या निशाण्यावर आजरेकर

जाहिरात

 

५० हून अधिक नगरसेवकांनी दिल्या काँग्रेसकडे मुलाखती ! इच्छुकांची संख्या ३२९ ! !

schedule17 Dec 25 person by visibility 11 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने सोळा आणि सतरा डिसेंबर २०२५ या कालावधीत इच्छुकांच्या मुलाखती दिल्या. एक ते वीस प्रभागासाठी काँग्रेसकडे ३२९ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस कमिटी येथे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुलाखती झाल्या. तब्बल चाळीसहून अधिक माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे. या मुलाखती दरम्यान, इच्छुकांनी, ‘काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे. तुम्ही जो निर्णय द्याल तो आमच्यासाठी अंतिम असेल’ असे सांगत सर्वच प्रभागांमधील आमदार पाटील यांना आश्वस्त केले. 

पहिल्या दिवशी मंगळवारी एक ते दहा प्रभागात मिळून १३५ इच्छुकांनी उमेदवारी मागितली. बुधवारी प्रभाग ११ ते २० मधील  इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती  झाल्या. दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांत काँग्रेसकडे ३२९ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन चव्हाण, सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, आनंद माने, राजू लाटकर, भारती पोवार, सरला पाटील, भरत रसाळे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. प्रभाग क्रमांक एक ते दहापर्यत पहिल्यादिवशी मुलाखती झाल्या होत्या. यामध्ये माजी नगरसेवक सुभाष बुचडे, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, अजित पोवार धामोडकर, माणिक पाटील, माधुरी लाड, मोहन सालपे, कैलास गौडदाब, धनंजय सावंत, प्रकाश पाटील, मंगल चव्हाण, मायादेवी भंडारे, राजाराम गायकवाड,अर्जुन माने, जय पटकारे, अफजल पिरजादे,उमा बनछोडे, श्रीकांत बनछोडे, इंद्रजीत बोंद्रे, राहुल माने, प्रताप जाधव, दीपा मगदूम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या.

बुधवारी प्रभाग ११ ते २० मधील मुलाखती झाल्या. यामध्ये माजी नगरसेवक जयश्री सचिन चव्हाण, सचिन चव्हाण, ईश्वर परमार, वृषाली दुर्वास कदम, पद्मजा भुर्के, माणिक मंडलीक, भूपाल शेटे, शमा मुल्ला, विनायक फाळके, विजय सुर्यवंशी, शिवाजी कवाळे, संजय मोहिते, सुरेश ढोणुक्षे, पद्मावती काकासाहेब पाटील, शोभा कवाळे, प्रवीण केसरकर, मधुकर रामाणे, वनिता देठे, प्रतिक्षा पाटील यांनी मुलाखती दिल्या. यशोदा रविंद्र आवळे, रियाज सुभेदार, प्रवीण सोनवणे,  उदय पोवार, अमर समर्थ, आश्विनी अनिल कदम, उत्तम शेटके, दुर्वास कदम यांनी मुलाखती दिल्या. स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर व माजी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबांतील सदस्य संख्या पन्नासहून अधिक आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes