Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रा. सुधाकर मानकर यांच्या शोकसभेचे बुधवारी कोल्हापुरात आयोजन  सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला हिंदकेसरी, पुण्याचा पृथ्वीराज मोहोळला उपविजेतेपदशिवसेना ठाकरे पक्षातर्फे मोदी सरकारच्या विरोधात विडंबनात्मक आंदोलनडीवाय पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेच्या 132 विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड फुटबॉलच्या मैदानातही नगरसेवकच ठरले भारी, अधिकारी संघावर ३-२ गोलफरकांनी विजयबालिंगा पंपिंगवर अवलंबून असणाऱ्या भागांचा सोमवारी पाणीपुरवठा बंदप्राधिकरणला विशेष दर्जा, हद्दवाढ विरोधी कृती समितीतर्फे आमदार चंद्रदीप नरकेंचा सत्कारनेत्यांना हद्दवाढीविषयी देणेघेणे आहे की नाही ? पालकमंत्री, सहपालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : कृती समितीच्या बैठकीत तीव्र भावनासंजय शिंदेंच्या कोल्हापुरातील दीर्घकालीन पदस्थापनेची उच्चस्तरीय चौकशी करावी - प्रकाश बेलवाडेप्राधिकरणाच्या विशेष दर्जाचा हद्दवाढीवर परिणाम नाही, २०२७ च्या जनगणनेनंतर हद्दवाढ अटळच : राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

प्रा. सुधाकर मानकर यांच्या शोकसभेचे बुधवारी कोल्हापुरात आयोजन  

schedule18 May 26 person by visibility 83 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी कोल्हापूर :   कै. प्रा. सुधाकर मानकर यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी व त्यांच्या संघटनात्मक कार्यास कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, बुधवारी २० मे २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत “ नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स & कॉमर्स ” बिंदू चौक, कोल्हापूर,येथील प्रा.पुष्पा देशपांडे सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे. तरी, सर्व मान्यवर आजी-माजी प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर काम केलेले आजी- माजी सदस्य, तसेच आजी-माजी प्राचार्य , शिक्षक, नागरीक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुटा संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे

   शोकसभेस डॉ.जे.एन.शुक्ला ‘एआयफ्रुक्टो’ सचिव, डॉ.सदानंद भट्टाचार्य ‘एआयफ्रुक्टो’-खजिनदार, डॉ.अशोक बर्मन ‘एआयफुक्टो’- माजी अध्यक्ष व सचिव, डॉ.महादेव देसाई  ‘एआयफ्रुक्टो’- उपाध्यक्ष, प्राचार्य आर. हलेश बेंगलोर ‘एआयफ्रुक्टो’-संपादक, तिमाही बातमीपत्र, डॉ.शेरलीकर‘गुलबर्गा सेवानिवृत्त प्राध्यापक संघटना’- ‘सचिव’,डॉ.शांता बी ‘गुलबर्गा सेवानिवृत्त संघटना’-कार्यकारिणी सदस्य, व अन्य राज्यातील सेवानिवृत्त संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
        सुधाकर मानकर यांनी ‘अखिल भारतीय प्राध्यापक  महासंघ’ - अध्यक्ष, ‘कॉलेज व युनिव्हर्सिटी रिटायर्ड टिचर्स असोसिएशन’- अध्यक्ष, ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ रिटायर्ड कॉलेज  युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशन’कार्यकारिणी सदस्य , ‘संभाजीराव जाधव स्मृती प्रतिष्ठान’ -सेक्रेटरी, ‘एआयफुक्टो’- माजी राष्ट्रीय सचिव, व झोनल सचिव, ‘सुटा’ पतसंस्था संस्थापक प्रवर्तक आणि संचालक, ‘टिचर्स बिनेव्होलंट फंड’ व ‘सुटा’संलग्नीत संस्थाचे मार्गदर्शक म्हणून काम केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी अखेर पर्यत ‘सुटा’ संघटनेस मार्गदर्शन आणि कायदा सल्लागार म्हणून काम पहिले. 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes