+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule31 Mar 24 person by visibility 216 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
प्रा संजय मंडलिक यांना खासदार करून कागल तालुक्याचा सन्मान आणि स्वाभिमान जपूया, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यां नी केले. त्यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयाच्या रुपाने लोकनेते कै. खासदार सदाशिवराव मंडलिक यांना वंदन करू या. मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावे वेगवेगळी होऊच शकत नाहीत. आम्ही अनेक वर्ष एकत्र काढली आहेत. दुर्दैवाने काही मतभेद झालेही. परंतु; मनातील आत्मीयता आणि जिव्हाळा कधीच कमी झाला नाही.’असेही मुश्रीफ म्हणाले.
   कागलमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते.   मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाचे मताधिक्य हे प्रा. संजय मंडलिक यांना विजयाप्रत नेणारे ठरेल. योगायोगाने आजच त्यांच्या मातोश्री कै. विजयमाला मंडलिक यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून मोठ्या चिकाटीने आणि कसोशीने मंडलिक यांना विजयी करूया. गुरुवार दि. ४ पासून जिल्हा परिषद मतदार संघनिहाय सेनापती कापशी, नानीबाई चिखली, उत्तुर, कडगाव -गिजवणे, बिद्री, सिद्धनेर्ली, कसबा सांगाव, व त्यानंतर कागल, मुरगुड व गडहिंग्लज ही शहरे, असे प्रचार सभांचे नियोजन करू.
      प्रा . संजय मंडलिक म्हणाले, कागल तालुक्यात विकासाचे राजकारण करण्यासाठी स्पर्धा असते. माझ्या उमेदवारीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक व महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विकासासाठी एकत्र येण्याची गरज असून कागल तालुक्याचा खासदार होत असताना तालुक्यातील सर्व नेतेमंडळींनी एकत्र येण्याची गरज आहे. स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे व स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर या तालुक्याच्या पालकत्वाची जबाबदारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. आपण, पालकमंत्री हसन मुश्रीफ व समरजीतसिंह घाटगे विकासासाठी एकत्र आलो आहोत. दरम्यान; माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनाही मी भेटून मदतीसाठी विनंती करणार आहे. 
 यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप  माने, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील- गिजवणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, कागल विधानसभा अध्यक्ष वसंतराव धुरे, बाचणीचे माजी सरपंच सूर्यकांत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, प्रा. सिद्धार्थ बन्ने, गडहिंग्लजचे माजी नगरसेवक नरेंद्र भद्रापूर आदींची भाषणे झाली.   
     व्यासपीठावर बिद्रीचे संचालक रावसाहेब खिल्लारे, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, तात्यासाहेब पाटील, ॲड. जीवनराव शिंदे, दिनकर कोतेकर, नारायण पाटील, आर. व्ही. पाटील, सूर्याजीराव घोरपडे, किरणराव कदम, वसंतराव यमगेकर, राजू खणगावे, अनुप पाटील, प्रकाश पताडे, गुंडेराव पाटील, विष्णुपंत केसरकर, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, दीपक देसाई, रणजीत सूर्यवंशी, सुभाष चौगुले, जयदीप पवार, संजय फराकटे, निलेश शिंदे, मयूर आवळेकर, कृष्णा पाटील, बच्चन कांबळे, प्रवीण काळबर आदी प्रमुख उपस्थित होते.  
 राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष नितीन दिंडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनी आभार मानले.
.