Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर ! शंकरराव माळींना समाजरत्न, कांता माळींना आदर्श माता पुरस्कार ! !राजू मानेंचे प्रशासनाला शहर विकास प्रकल्पासंबंधीचे निवेदनगंगावेश तालमीचे रखडलेले काम मार्गी लावू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महाराष्ट्र कस्ती संघटनेला ग्वाहीसरकारी कमिटीला सरकारच्याच आदेशाचा विसर !  पूररेषेच्या सर्व्हेक्षणाची मुदत उलटूनही समितीची ना बैठक…ना पाहणी, अहवाल तर लांबच ! !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजामुळे हजारो सभासद मतदानापासून वंचित, चित्रपट महामंडळात परिवर्तन गरजेचे पी. सावळाराम यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे, उपाध्यक्षपदी संजय शेटे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन ! रंगबहारर संस्थेसह चित्रपट व्यावसायिकही उपस्थित कोरे अभियांत्रिकीमध्ये पीबीएल दिन उत्साहातमहिला - बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा,  दीपा ठाणेकरांची सहपालकमंत्र्यांच्याकडे मागणी

जाहिरात

 

लिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर ! शंकरराव माळींना समाजरत्न, कांता माळींना आदर्श माता पुरस्कार ! !

schedule04 Jun 26 person by visibility 107 categoryलाइफस्टाइल

पट्टणकोडोलीच्या सी.एम. माळी यांच्या कुटुंबाला आदर्श कुटुंब पुरस्कार 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा समाजरत्न पुरस्कार प्रा. शंकरराव माळी-यादव तर आदर्श माता पुरस्कार रुकडी येथील श्रीमती कांता दत्तात्रय  माळी यांना जाहीर करण्यात आला आहे. आदर्श कुटुंब पुरस्कार पट्टणकोडोली येथील उद्योजक सी.एम. माळी यांच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी, ( तेरा जून २०२६ )  सकाळी साडे अकरा वाजता कोल्हापुरातील बिंदू चौक येथील अक्क महादेवी मंडप येथे करण्यात येणार आहे.

लिंगायत माळी समाजाच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्याचे वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.  याचबरोबर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील गुणी आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचा उपक्रम ही यावेळी राबविण्यात येणार आहे. समाजासाठी अनेक वर्षे निस्वार्थपणे कार्यरत असणाऱ्या काही व्यक्तींचा कृतज्ञता गौरव सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes