शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखपदी मंजीत माने, कोल्हापूर दक्षिण प्रमुखपदी विशाल देवकुळे
schedule02 Apr 26 person by visibility 32 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवसेना ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर उत्तर शहर प्रमुखपदी मंजीत माने यांची तर कोल्हापूर दक्षिण प्रमुख पदी विशाल देवकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून या संदर्भातील नियुक्ती जाहीर करण्यात आले आहेत. इचलकरंजी शहर शिवसेना प्रमुख पदी शिवाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरसेवक सुनील मोदी यांनी महापालिका निवडणुकीनंतर शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे कोल्हापूर उत्तर शहर प्रमुख पद रिक्त होते. त्या रिक्त जागेवर माने यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे.