+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Mar 23 person by visibility 275 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत झुंजार स्पोर्टस् ने उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम मंडळ संघाला २-० अशा फरकाने पराभूत करत पुढील फेरीत प्रवेश केला. संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेने स्पर्धेचे आयोजन केले आहे.  पूर्वार्धात दोन्ही संघांनी सावध खेळ केला. अचूक समन्वयाअभावी दोन्ही संघ गोल न करु शकल्याने मध्यंत्तरास सामना शून्य गोलबरोबरीत होता. उत्तरार्धात झुंजारच्या कार्लोसने गोल सामन्यात आघाडी घेतली. ६५ व्या मिनिटाला राजेश बोडेकरने गोल करत झुंजार स्पोर्टस् ला २-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी पूर्णवेळेत कायम टिकवत झुंजारने विजय मिळविला. त्यांच्या समर्थ नवाळे, शाहू भोईटे, राजेश बोडेकर यांचा चांगला खेळ केला. उत्तरेश्वरकडून मयूर कदम, स्वराज्य पाटील, अक्षय शिंदे, ओमकार केर्लेकर, निलेश साळोखे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यात उत्तरेश्वरच्या प्रतिक कांबळेने गैरवर्तन केल्याने पंचांनी त्याला रेडकार्ड दाखविले. झुंजारच्या आकाश बावकर याची उत्कृष्ट खेळाडू तर उत्तरेश्वरच्या निलेश साळोखे याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.

रविवारचा सामना, खंडोबा तालीम मंडळ वि. पाटाकडील तालीम मंडळ, दुपारी ४ वा.