केशवराव भोसलेंनी संगीत-नाट्यकला समृद्ध केली, त्यांच्या नावाचा पुरस्कार ऊर्जा देणारा- अभिनेते विक्रांत आजगावकर
schedule13 Oct 25 person by visibility 9 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी संगीत व नाटयकला समृद्ध केली. त्यांच्या नावांनी मिळालेला पुरस्कार हा ऊर्जा देणारा आहे. ’अशी भावना गायक-अभिनेते विक्रातं आजगावकर यांनी व्यक्त केली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कला अकादमी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आजगावकर यांना ‘संगीतसूर्य कलादर्श पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात आला. मानचिन्ह, मानपत्र, फेटा व रोख अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या प्रसंगी बोलताना आजगावकर यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या संगीत आणि नाटयकलेतील योगदानाविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी येडगे यांनी, ‘संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नाटकलेचा वारसा अभिनेते आजगावकर हे आपल्या संगीत गायनातून पुढे चालवित आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी राजाश्रय दिल्यामुळे कोल्हापुरात कलाक्षेत्र बहरले. अनेक कलाकार घडले.कोल्हापूर म्हणजे कलानगरी अशी ओळख बनली.’असे नमूद केले. अकादमीचे अध्यक्ष मोहन भोसले यांनी ट्रस्टतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या कलाक्षेत्रातील कर्तबगारीची महती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. तेजस्विनी पाटील-डांगे यांनी प्रास्ताविक केले. पौर्णिमा मोरे यांनी सूत्रसंचालन केले. युवराज घोरपडे यांनी आभार मानले.