+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Mar 24 person by visibility 213 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "लोकांच्या आग्रहामुळेच मी राजकारणात उतरलो आहे. माझी उमेदवारी ही जनतेची आहे. महाविकास आघाडीचे नेते, मित्रपक्ष आणि जनता या साऱ्यांचा मी आभारी आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार आणि समाजातील सर्व घटकांची विकासाची समान दिशा." अशी भूमिका श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी मांडली.
 महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली. महाराज हे काँग्रेसच्या चिन्हावर लढणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू महाराजांचा शुक्रवारी पत्रकारांच्यासोबत वार्तालापचा कार्यक्रम झाला. या वार्तालापमध्ये महाराजांनी जिल्ह्याच्या विकासाची भूमिका मांडली. शैक्षणिक. सांस्कृतिक, क्रीडा,शेती, औद्योगिक अशा विविध क्षेत्रात संपूर्ण जिल्ह्याचा सर्वंकष विकास याबाबत आपला प्राधान्यक्रम राहील. रेल्वे, विमानतळ, ग्रामीण भागातील, पायाभूत सुविधा, ऐतिहासिक पर्यटन, एज्युकेशन हब यावर फोकस राहील. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून उमेदवारी घ्यावी अशी इच्छा होती. मला उमेदवारीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे तिन्ही पर्याय उपलब्ध होते. मी उमेदवारीसाठी कुठे गेलो नाही. काँग्रेसची वैचारिक नाते त्यामुळे आपण काँग्रेसचे उमेदवारी स्वीकारले. न मागता मला उमेदवारी मिळाली हे खरे लोकशाहीचे लक्षण आहे." असे महाराजांनी स्पष्ट केले. देशातील सध्याच्या राजकारणावर टिप्पणी करताना लोकशाहीची पावले एकाधिकारशाहीकडे वळू नयेत असे मतही त्यांनी मांडले. संविधानानुसारच देशाचे कामकाज चालले पाहिजे. संविधान कोणी बिघडवू शकत नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ही खूप मोठी देणगी आहे. संविधान कोणी मोडू शकत नाही. असेही त्याने स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतीला प्रोत्साहित करणारे धोरण राबविले पाहिजे. असेही महाराजांनी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्याला मोठी सैन्य परंपरा आहे. अनेक तरुण देशसेवेसाठी भरती होतात. मात्र सध्या चार वर्षाच्या कालावधीसाठी अग्निवीर म्हणून होणारी भरतीची संकल्पना मला कळली नाही. त्या तरुणांचे चार वर्षानंतर पुढे काय ? असा प्रश्न महाराजांनी उपस्थित केला.