Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
युवा स्पोर्ट्स, गारगोटी मंडळाच्या गणेशमुर्तीचे थाटात आगमणगणेशोत्सव... माय मराठीचा गजर अन पुस्तकाची निर्मिती ! छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची बातच न्यारी !!गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल ! मुख्यमंत्री मार्ग काढतील !! - मंत्री हसन मुश्रीफ'दिलखुलास’मध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची विशेष मुलाखतजिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन ४०० शिक्षक, नियुक्ती पत्रे प्रदानभाऊसिंगजी रोडवरील जागा विकसितचा निर्णय सतरा सप्टेंबरच्या बैठकीतकोल्हापूर महापालिकेने केली पाणीपट्टीत वाढ, एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटीलरानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणी

जाहिरात

 

युवा स्पोर्ट्स, गारगोटी मंडळाच्या गणेशमुर्तीचे थाटात आगमण

schedule11 Sep 26 person by visibility 13 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवा  स्पोर्ट्स सार्वजनिक गणेश उत्सव मंडळा, गारगोटी मंडळाच्या श्री गणेशमूर्तीचे भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात थाटात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषात गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान परिसरातील नागरिक व गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईने जल्लोष करत गणरायाचे स्वागत केले. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गणेशमूर्तीचे विधिवत स्वागत करून स्थापना स्थळी नेले. यावेळी भाविकांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. गणेशोत्सव काळात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. 

यावेळी मिरवणूकीचा शुभारंभ प्रातांधिकारी हरेश सुळ, पोलीस निरीक्षक संदीप जगताप, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, सर्जेराव देसाई, अंकुश चव्हाण, बाजीराव चव्हाण, माजी उपसरपंच अरुण शिंदे, दिपक देसाई, रणधिर शिंदे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes