Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कार

जाहिरात

 

प्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्र

schedule21 Sep 26 person by visibility 6 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रारी व आक्षेप प्राप्त होत असून, त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास योग्य प्रशासकीय व विभागीय कारवाई करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिव तसेच नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे निवेदन दिले आहे.

प्राधिकरणाच्या माध्यमातून शहर हद्दवाढ, विकासकामे, अनधिकृत बांधकामांवरील नियंत्रण, पायाभूत सुविधा तसेच नागरिकांशी संबंधित विविध महत्त्वाचे विषय हाताळले जात असताना लोकप्रतिनिधींशी आवश्यक समन्वय राखला जात नसल्याचा आक्षेप क्षीरसागर यांनी घेतला आहे. गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना प्राधिकरणाच्या आढावा बैठकीस निमंत्रित केले नसल्याचे तसेच विकासकामे व प्रशासकीय निर्णयांचा सविस्तर आढावा अहवालही सादर करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली असतानाही प्रस्तावित हद्दवाढीतील गावांमध्ये जनजागृती, नागरिकांशी संवाद, ग्रामस्तरावरील बैठका आणि मूलभूत सुविधांच्या नियोजनाबाबत प्रभावी कार्यवाही झालेली दिसत नसल्याचा मुद्दाही क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes