Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप पदाधिकाऱ्यांची कर्मचारी सोसायटीला भेट, कामकाजाचे केले कौतुक ! जिल्हा परिषदेची बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा रद्दशिक्षक -पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 23 ऑक्टोबरला मतदानपुणे पदवीधर- शिक्षकसाठी महायुतीतील पक्षांची वाटचाल स्वतंत्रपणे लढण्याकडे ! मंत्र्यांच्या विधानांनी मैत्रीपूर्ण लढतीचे चिन्हे अधिक !!कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखल

जाहिरात

 

जिप पदाधिकाऱ्यांची कर्मचारी सोसायटीला भेट, कामकाजाचे केले कौतुक !

schedule22 Sep 26 person by visibility 49 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा शशिकांत खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती  शितल प्रवीण यादव , समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा अविनाश गायकवाड व महिला बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेबद्दलची माहिती चेअरमन संजय शिंदे, संचालक अजय शिंदे, रणजित पाटील व उत्तम वावरे यांनी दिली. पदाधिकाऱ्यांनी माहिती ऐकून संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी अभ्यासिकेला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले आणि सभासदांच्या मुलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes