समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास कात्यायनी परिसरात अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार - आमदार सतेज पाटील
schedule30 Sep 26 person by visibility 24 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :- ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास गोकुळ दूध उत्पादकांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला अधिक चांगला दर देणार. म्हैस खरेदीसाठी अनुदान तसेच मुक्त गोठ्याच्या कंपाउंडसाठी ५० टक्के अनुदान देणार. पशुखाद्याच्या दरात प्रति पोते १०० रुपयांची कपात करणार. कळंबा-गारगोटी मार्गावरील कात्यायनी येथील २० एकर जागेत अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार.’अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.
राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्यावतीने हातकणंगले पेठवडगाव,रुई, हातकणंगले, इंगळी, रेंदाळ येथे ठरावधारकांचा मेळावा पार पडला.याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान या दौऱ्यात त्यांनी, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, किरण इंगवले, हुपरी नगरसेवक सुरज बेडगे, रवी नाईक शिरीष देसाई शिवराज नाईक भगवान जाधव धोंडीराम पाटील या प्रमुख लोकांची भेट घेतली.
ठरावधारकांच्या मेळाव्यात आमदार पाटील म्हणाले,‘गोकुळ दूध संघ हा कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याच हक्काचा राहिला पाहिजे यासाठी आमचा लढा सुरू आहे. एवढंच नाही, तर भविष्यात गोकुळ दूध संघाचा कारभार परप्रांतीय अमूलवर अवलंबून राहता कामा नये. गोकुळच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक रुपयामागे ९० पैसे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार प्राथमिक दूध संस्थांच्या इमारती बांधकामासाठी अनुदान, संस्था सचिवांना मानधन आणि जनावरांच्या गोठ्यासाठी २५ हजार रुपयांचे सहाय्य देणार जनावरांच्या गाभण प्रक्रियेसाठी ब्रीडिंग नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.’
या मेळाव्यास गुलाबराव पोळ, उपनगराध्यक्ष अभिजीत गायकवाड, भगवानराव जाधव, शशिकांत खवरे, राहुल सावंत, महेश कुंभार, उत्तम सावंत, अभिषेक इंगवले, कपिल पाटील, भारत पाटील, राजवर्धन पाटील, ॲड शहाजी पाटील, अभिजीत पाटील, अभिजीत माने, बाळासाहेब माने, अजित पोवार- धामोडकर, प्रवीण सोनवणे, आदेश राजूबाबा आवळे, बाबासो चौगले, रामराजे कुपेकर, बयाजी शेळके, सचिन घोरपडे, बाबासो देवकर, विकास पाटील, विद्याधर गुरबे, विशाल पाटील, मोहन धुंदरे उपस्थित होते.