Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापटयुवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजनधम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी धम्मविचार साहित्य संमेलनडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपविकसित कोल्हापूर २०४७ साठी राज्यपालांकडे कोल्हापूर फर्स्टची भूमिकाभागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीलाघरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिकलग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोलागोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशराज्यपालांच्यासोबत डॉ संजय डी. पाटलांचा संवाद ! कृषी, साखर उद्योग, दूध व्यवसाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा !!

जाहिरात

 

अभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापट

schedule30 Sep 26 person by visibility 41 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे २०२३ पासून विद्यार्थ्यांकडून २५ रुपये इतक्या घेण्यात येणाऱ्या ज्युबिली फंडाचा संपूर्ण व पारदर्शक आर्थिक लेखाजोखा जाहीर करावा, आजपर्यंत जमा झालेला निधी विद्यार्थ्यांच्या संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्यविकास व विद्यार्थीहिताच्या उपक्रमांसाठी वापरावा तसेच यापुढे विद्यार्थ्यांकडून फंडाच्या नावाखाली कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारू नये, या मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगरतर्फे बुधवारी, ३० सप्टेंबर २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी, मुख्य प्रवेशद्वावर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारातच अडविले. यावेळी कार्यकर्ते व सुरक्षारक्षकांत झटापट झाली. अखेर कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारत याविषयी चर्चा केली. २ नोव्हेंबर २०२६ रोजी अभाविपच्या मागण्यांबाबत विद्यार्थीहिताचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याने अभाविपने आंदोलन स्थगित केले. आंदोलनात यावेळी कोल्हापूर महानगर मंत्री प्रेम राजमाने, सहमंत्री साक्षी जाधव, साहिल पाटील, अभय शेलार, सांगली जिल्हा संयोजक केतन शेंडगे, कराड, सातारा मधून विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes