धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी धम्मविचार साहित्य संमेलन
schedule30 Sep 26 person by visibility 10 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी (चार ऑक्टोबर २०२६) धम्म विचार साहित्य व संस्कृती संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात धम्मविचार, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाच्या विविध पैलूंवर दिवसभर चर्चा होईल. अॅड. कृष्णा पाटील, धम्म अभ्यासक भदंत एस संबोधी, दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी १०.३ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा अॅड. करुणा विमल यांनी दिली.या संमेलनात धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार सचिन मून, अभ्यासक रंगराव पांडे यांना दिला जाणार आहे. पत्रकार परिषदेला डॉ. स्वाती नांगरे, सुप्रभा चोपडे, विश्वास तरटे, सुनील जाधव, विमल पोखर्णीकर आदी उपस्थित होते. शाहू स्मारक भवन येथे संमेलन आयोजित केले आहे.