घरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिक
schedule29 Sep 26 person by visibility 6 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘साखर उद्योगासमोरील अडचणी लक्षात घेत या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी घरगुती व व्यवसायकरिता वापरण्यात येणाऱ्या साखरेला वेगवेगळे दर असायला हवेत. तसेच पेट्रोलमध्ये इथेनॉलाचे प्रमाण २५ टक्के असायला हवे. साखरेच दर हा प्रतिकिलो किमान पन्नास रुपये हवा.’असे मत श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले. साखर उद्योगाशी निगडीत विविध विषयासंबंधी साखर संघ, सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे असेही महाडिक म्हणाले.
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी २९ सप्टेंबर २०२६ झाली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखाना स्थळावर वार्षिक सभा झाली. या सभेत विषयपत्रिकेवरील तेरा विषय मंजूर क रण्यात आले. कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
आमदार महाडिक यांनी, प्रास्ताविकात ‘कारखान्याचे विस्तारीकरण केल्यामुळे रोज पाच हजार टन ऊस गाळप होणार आहे. यंदाच्या हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे आमदार महाडिक यांनी सांगितले. कारखाना विस्तारीकरणास्तव गेला हंगाम बंद होता यामुळे सभासदांना देण्यात येणारी साखर येत्या जानेवारी महिन्यात पन्नाट टक्के मिळेल.’
कारखान्यातर्फे को जनरेशन प्रकल्प साकारत आहे. दरम्यान साखर कारखान्याकडून निर्माण होणाऱ्या वीजेला प्रतियुनिट सहा रुपये मिळावेत. सध्या महावितरणकडून प्रति युनिट चार रुपये ७५ पैसे मिळतात. राज्य सरकारने प्रतियुनिट सव्वा रुपयेचे द्यावेत.’अशी मागणीही महाडिक यांनी केली. कारखान्याचे संचालक तानाजी पाटील यांनी आभार मानले.सभेला व्हाइस चेअरमन गोविंदा चौगले, संचालक दिलीप पाटील, शिवाजी पाटील, मारुती किडगावकर, सर्जेराव भंडारे, विलास जाधव, संजय मगदूम, विजय भोसले, डॉ. विश्वास बीडकर, सर्जेराव पाटील, संतोष पाटील, कल्पना पाटील, वैष्णवी नाईक, मीनाक्षी पाटील, सुरेश तानगे, नंदकुमार भोपळे, धीरज उलपे, बाजीराव चौगले, नेमगोंडा पाटील, अमित साजणकर, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.