+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Jan 24 person by visibility 273 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
करवीर तालुक्यातील दोनवडे गावात आर्थिक वादातून हॉटेल मालकाचा बंदुकीतून गोळी झाडून खून झाला. हॉटेल मालक चंद्रकांत आबाजी पाटील (वय ५५ रा. दोनवडे ,ता. करवीर) हे जागीच ठार झाले त्यांचा मुलगा रितेश पाटील हा जखमी झाला. संशयित दत्तात्रय कृष्ण पाटील (वय ४०) आणि सचिन गजानन जाधव ( ३८ दोघे रा.खुपिरे, या.करवीर) पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.
पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली, चंद्रकांत पाटील यांचे दोनोडे फाटा येथे गोल्डन हॉटेल बार व लॉजिंग आहे गेल्या दोन वर्षापासून हॉटेल व्यवसाय बंद आहे फक्त लॉजिंग सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांच्याकडे काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास दिली होती. यामध्ये दोघांना नुकसान झाले होते. तेव्हापासून चंद्रकांत पाटील व दत्तात्रय पाटील यांच्या वाद होता.
शनिवारी सकाळी चंद्रकांत पाटील यांचचा मुलगा रितेश हॉटेलमध्ये आला होता. लॉजिंग सुरू असल्याने तो दिवसभर हॉटेलमध्ये थांबून होता .रात्री साडेनऊच्या सुमारास चंद्रकांत पाटील दुचाकीवरून हॉटेलमध्ये आहे. काही वेळातच संशयित दत्तात्रय पाटील व सचिन जाधव हे दुचाकीवरून हॉटेलमध्ये आले. यावेळी चंद्रकांत पाटील व दत्तात्रय पाटील यांच्या वाद सुरू झाला. दत्तात्रय आणि सचिन दोघेही चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी वडिलांना सोडवण्यासाठी रितेश मध्ये आला. अचानक दत्तात्रय पाटील ने स्वतः जवळील गावठी कट्टा काढून चंद्रकांत पाटील यांच्यावर रोखून धरत थेट गोळी झाडली. ही गोळी चंद्रकांत पाटील यांच्या छातीला लागली हे जागेवर कोसळले .मोठा रक्तस्त्राव झाला. या घटनेनंतर सचिन जाधव आणि दत्तात्रय पाटील यांनी मोटरसायकल वरून पळ काढला. रितेशने झालेल्या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी चंद्रकांत पाटील यांना रुग्णवाहिकेतून सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. घटनास्थळी अप्पर पोलीस उपाधीक्षक निवेश खाटमोडे पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी भेट दिली. घटनास्थळी पोलिसांनी पुंगळी जप्त केली.