Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतील

जाहिरात

 

विवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कार

schedule30 Apr 26 person by visibility 25 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : येथील विवेकानंद कॉलेजमधील कर्मचारी राजेंद्र साळुंखे,  हे ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.  या निमित्ताने त्यांचा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे व कोल्हापूर विभागप्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे यांच्या हस्ते मानपत्र, शाल श्रीफळ, पोशाख देऊन सत्कार करण्यात आला.  

कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून झाली. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष  हितेंद्र साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन अमित साळुंखे यांनी केले.  याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे मा. कौस्तुभ गावडे म्हणाले, सेवा बजावत असताना कामावर निष्ठा ठेवून काम करा म्हणजे असा सेवागौरव होतो व प्रामाणिकपणाच्या सेवेचे फळ मिळते.डॉ. श्रीराम साळुंखे म्हणाले, कुटुंबातील अबाधित ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र साळुंखे. त्यांनी दोन पिढ्यांमधील जिव्हाळा जपला.  यावेळी प्रा. प्रकाश साळुंखे, भरत कवठेकर, राजकुमार देसाई, प्रतीक साळुंखे, अनिल पवार, डॉ. नीता पाटील  प्रा.मनीषा साळुंखे यांनी मनोगते मांडली.  

सत्काराला उत्तर देताना राजेंद्र साळुंखे म्हणाले, या विवेकानंद शिक्षण संस्थेमुळे माझे जीवन घडले मला सामाजिक मान सन्मान मिळाला, माझे कुटुंब स्वावलंबी झाले,  त्याबद्दल मी या संस्थेचा आजन्म ऋणी राहीन. प्राचार्य डॉ. सी बी पाटील यांनी सेवानिवृत्ती हा भावनिक क्षण असल्याचे सांगून त्यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आरोग्यदायी व सुखी समाधानी जीवनासाठी साळुंखे यांना शुभेच्छा दिल्या.  अमर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. बबन करपे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes