महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !
schedule28 Apr 26 person by visibility 32 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र जैन साहित्य परिषद, कोल्हापूरतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि लठ्ठे फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भरत लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम एक मे २०२६ रोजी होत आहे. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीध्ये दसरा चौक परिसरातील दिगंबर जैन बोर्डिंगमधील सभागृहात हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता होणार असल्याची माहिती चेअरमन प्रा. डी.ए. पाटींल यांनी दिली.
स्वस्तिश्री चंद्रकीर्ती लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य जीवनगौरव पुरस्कार संपादक वसंत भोसले यांना जाहीर झाला आहे. स्वर्गीय जी. के. पाटील उत्कृष्ट संपादक पुरस्कार जयसिंगपूर येथील डॉ. महावीर अक्कोळे यांना जाहीर झाला. डॉ. ए. एन. उपाध्ये ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार बारामती येथील साहित्यिक धनंजय शहार यांना तर दिवाणबहाद्दर अण्णासाहेब लठ्ठे पत्रकार पुरस्कार कोल्हापुरातील पत्रकार विद्याधर पिंपळे यांना घोषित झाला. जोहडकार सौ. सुरेखा शहा ज्येष्ठ महिला साहित्यिक पुरस्कार जयसिंगपूर येथील कवयित्री निलम माणगावे यांना देण्यात येणार आहे. परपमूज्य १०५ आर्यिका जिनचंद्रजी उत्कृष्ट सामाजिका महिला श्राविकारत्न पुरस्कार जयसिंगपूर येथील विमल देवगोंडा पाटील यांना जाहीर झाला. या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला सचिव संजय पाटील, बोर्डिंगचे चेअरमन विजयकुमार शेट्टी, अधीक्षक जयवंत कोले उपस्थित होते.