Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतीलभाजपच महिला आरक्षणाच्या विरोधात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चोचे सोंग - आमदार विश्वजीत कदमकोल्हापूरच्या विकासाचा बनणार ॲक्शन प्लॅन : मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये २८ विषयावर चर्चादूध संस्थांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करा, संस्था प्रतिनिधी धडकले सहायक निबंधक कार्यालयावर

जाहिरात

 

गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती

schedule29 Apr 26 person by visibility 95 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सर्वांना दिल्या आहेत, असे स्पष्टीकरण गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. या संदर्भातील अपुऱ्या माहितीवरील कोणत्याही बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
       मंगळवार  २८ रोजी रात्री गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत महायुतीमधील सर्व नेतेमंडळींची तास ते दीड तासभर व्यापक बैठक झाली.  मुंबईत त्यांच्या वर्षा या बंगल्यावर झालेल्या या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील, पालकमंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनयराव कोरे, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाच्या संचालिका  शौमिका महाडिक, युवा नेते समित कदम आदी  नेतेमंडळी उपस्थित होती.
          
दरम्यान; या निवडणुकीत नवीन आलेल्या कायद्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की , ही निवडणूक मी ताबडतोब लावतो. विधिमंडळाने संमत केलेल्या नवीन कायद्याबाबतच्या अडचणी काय आहेत, त्याबाबतची माहितीही श फडणवीस यांनी दिली. त्यावर काय उपाय शोधता येतील, याबाबतही बैठकीत अनेक नेत्यांनी आपापली मते सुचविली आहेत. आज बुधवार दि. २९ कायदे सल्लागारांची बैठक घेऊन या दोन्हीही मुद्द्यांवर मी तोडगा काढतो आणि महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवा, असा आदेश मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आम्हा सर्व नेतेमंडळींना दिला आहे.
            
*अफवांवर विश्वास ठेवू नका.....!
 मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, आज अपुऱ्या माहितीवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. दि. चार मे २०२६ रोजीच ही सर्व परिस्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे, त्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेण्याचे कारण नाही.
=======

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes