रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी
schedule28 Apr 26 person by visibility 27 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : समाजाप्रती आपली जबाबदारी लक्षात घेऊन कोरगावकर ग्रुप आणि रगेडियन फिटनेस क्लब, रंकाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरामध्ये जनरल फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, होमिओपॅथी व ऑर्थोपेडिक तज्ज्ञांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच बीपी, शुगर तपासणीसह हृदयविकारासंदर्भातील सल्ला देखील देण्यात आला.शिबिराचे उद्घाटन नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते व कोरगावकर ग्रुपचे प्रमुख आकाश कोरगावकर,राज कोरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.या उपक्रमामध्ये 100 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा तसेच रक्तदान शिबिराचा लाभ घेतला.