Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतीलभाजपच महिला आरक्षणाच्या विरोधात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चोचे सोंग - आमदार विश्वजीत कदमकोल्हापूरच्या विकासाचा बनणार ॲक्शन प्लॅन : मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये २८ विषयावर चर्चादूध संस्थांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करा, संस्था प्रतिनिधी धडकले सहायक निबंधक कार्यालयावर जिल्हा परिषदेत बिल मंजुरीतील टेबल कमी होणार, बांधकाम विभागाचा निर्णय : सभापती सारिका नांदेकर

जाहिरात

 

रूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसे

schedule28 Apr 26 person by visibility 52 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन येथील सभागृहात  रूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा २०२६ चे उद्घाटन झाले कोल्हापूरच्या नागरिकांमधे मौखिक आरोग्याबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने इंडियन डेन्टल असोसिएशन ( आयडीए) कोल्हापूरच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. १ मे २०२६ ते १ ऑक्टोबर २०२६ या ५ महिन्यांपैकी किमान ३ महिने आयडीए सभासदाच्या दवाखान्यात जाऊन सल्ला व उपचार करून घेऊन अंतिम फेरीसाठी पात्र व्हायचे आहे. अंतिम फेरीतील विजेत्यामधे लाख रुपयांची बक्षीसे वितरित केली जातील. ही स्पर्धा रूट ३२ या मौखिक आरोग्य उत्पादक कंपनीने प्रायोजित केली आहे . या स्पर्धेचे उद्घाटन करताना केएमए अध्यक्ष म्हणाले,‘ नागरीक आणि डॉक्टर यांचे नाते अधिक दृढ करणारी ही स्पर्धा आहे. आयडीएला आणखी समाजोपयोगी उपक्रम करायचे असतील तर केएमए सदैव पाठीशी राहील.’ राज्य आयडीए सचिव डॉ विकास पाटील यांनी,”शहरातील नागरिकांनी  या योजनेचा फायदा घ्यावा” असे आवाहन केले. आयडीए कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ किशोर चौगुले यांनी स्वागत केले, आयडीए कोल्हापूरचे सचिव डॉ देवेंद्र खुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ आशुतोष देशपांडे यांनी मुक्तहास्य स्पर्धेविषयी माहिती दिली. डॉ अव्दैत आफळे, डॉ अजिंक्य पाटील, डॉ सुयोग कुलकर्णी, डॉ अमित शहा, डॉ दिग्विजय पाटील, डॉ अजय कदम, डॉ शैलेश जोशी उपस्थित होते.

…………………………

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes