महे येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वरुटे यांचा सत्कार
schedule23 May 26 person by visibility 72 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सोयाबीन पीक उत्पादन स्पर्धेत हेक्टरी ६९.२०० क्विंटल विक्रमी उत्पादन घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल राज्य सरकारच्यावतीने महे येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत दिनकर वरुटे यांचा उपविभागीय कृषि अधिकारी अरुण भिंगारदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, मंडल कृषि अधिकारी कविता जिचकर , उप कृषि अधिकारी सुनील रेपे व सहाय्यक कृषि अधिकारी प्रियंका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपविभागीय कृषि अधिकारी भिंगारदिवे यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना, 'चंद्रकांत वरुटे यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन सोयाबीनचे हेक्टरी ६९ क्विंटल एवढे उत्पादन काढले आहे. हेक्टरी जास्त उत्पादन काढल्याबद्दल त्यांचा जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक आला आहे. शासनाच्या वतीने त्यांचा पुन्हा जिल्हा स्तरावर भव्य सत्कार करणेत येणार आहे.त्यांनी नवीन पद्धतींचा वापर करून आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसे घेवू शकतो याचा आदर्श शेतकऱ्यांना दिला आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढले पाहिजे. तसेच रासायनिक खताचा वापर कमीत कमी करुन ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. 'असे सांगितले.
यावेळी माजी सरपंच सज्जन पाटील, दुध संस्थेचे चेअरमन बुद्धीराज शंकर पाटील, सेवा संस्थेचे चेअरमन बाजीराव जरग बापू, माजी सरपंच पंडीत पाटील ,पांडुरंग पाटील आबा, पांडुरंग केरबा पाटील, कृष्णात ठाणेकर, केरबा श्रीपती पाटील , राजाराम वरुटे, शितल संतोष पाटील, नामदेव वाईंगडे, बंडा शिंदे, तानाजी पाटील हुजरे, प्रकाश कोगेकर आदी शेतकरी उपस्थित होते.