खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठकीचे आयोजन: आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
schedule23 May 26 person by visibility 11 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत बैठक आयोजित करून त्यांच्या मागण्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिष्टमंडळाला दिले . समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना खाजगी शाळांच्या प्रश्नाबाबत निवेदन दिले. यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा .जयंत असगावकर , कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, सहाय्यक शिक्षण संचालक गणपतराव कमळकर उपस्थित होते .
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांचे प्रलिंबत प्रश्न मांडले. यामध्ये मुख्याध्यापकांचा अर्जित रजेचे रोखीकरण, करणे , समायोजनांस स्थागिती असलेने शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांचे शिक्षण संचालक यांनी त्यांचे समायोजन थांबविणे, वेतन आयोगातील फरकाच्या रकमा रोखीने मिळणे, संच मान्यता दुरुस्ती व पदे शिफ्टिंग करणेसाठी शिक्षण अधिकारी यांना टॅब उपलब्ध करून देणे ,शिक्षकांचे आभा कार्ड निघेपर्यंत त्यांची वैद्यकीय बिले पारित करणे ,90 पटअसलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे पद संरक्षित करणे , अनुकंपा व न्यायालयीन निर्णयानुसार वैयक्तिक मान्यता दिलेल्या शिक्षकाला शालार्थ आयडी मिळणे ,जनगणना कामात सहभागी असलेल्या शिक्षकांना बदली रजा मिळणे आदी मागण्या करण्यात आल्या.
संघटनेचे शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे, जिल्हाध्यक्ष कुमार पाटील, विभागीय अध्यक्ष महादेव डावरे व मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव दत्ता पाटील , विना अनुदानित कृती समितीचे बाबा पाटील , उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष इरफान अन्सारी , मुख्याध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे , सेनेचे सुनील जगताप उपस्थित होते ..